Home क्राईम चोरीच्या संशयावरून तरूणावर प्राणघातक हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

चोरीच्या संशयावरून तरूणावर प्राणघातक हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात चोरीच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणारे हम्मिद अब्बास खाटीक (वय ४९) यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या (वय १९) याने चोरी केली असल्याचा संशयावरून २४ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको भागात संशयित आरोपी पंकज, सुपड्या (पुर्ण नाव माहित नाही), किरण अशोक सपकाळे तिघे रा. पिंप्राळा हुडको जळगाव यांनी अबरारला गाठले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हातातील लाकडी दांडका आणि लोखंडी आसारीने अबरारवर हल्ला केला. या हल्ल्यात अबराज हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अबरारचे वडील हम्मीद खाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपड्या, पंकज आणि किरण अशोक सपकाळे (सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भिका खाटीक हे करीत आहे.


Protected Content

Play sound