चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर आणि चुंचाळे परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल २३ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ सीएससी केंद्र चालकांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्याचे कृषी अधिकारी दीपक भास्करराव साळुंखे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तपासात असे समोर आले की, १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत, शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात केळीचे पीक नसतानाही, या केंद्र चालकांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून राज्य शासनाचे १३.४४ कोटी आणि केंद्र शासनाचे १०.१८ कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न केला गेला.

याप्रकरणी अमोल भास्कर पाटील – चोपडा, सुदर्शन वासुदेव पाटील – चोपडा, नितीन भागवत माळी – चोपडा, जितेंद्र गुरुदास शिंपी – चोपडा , घनशाम अशोक भोई – चोपडा, पंकज नागेशराव सोनवणे – चोपडा, मनोज मुरलीधर पाटील – चोपडा, विनोद सुरेश जव्हागे – चोपडा, अविनाश विष्णू पाटील – चुंचाळे या नऊ जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



