एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना एरंडोल येथील मशिद अली वाडा परिसरात मंगळवारी १७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. या घटनेत कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण केली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात ९ जणंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल शहरातील मशिद अली वाडा परिसरात शेख शकील शेख लतीफ (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. संशयित आरोपी अरशद युनूस शेख दाऊद अलीमोद्दिीन शेख , अब्दुल्ला अलीमोद्दिन शेख, आवेश युनूस शेख , आबु बकर अबुल कासीम शेख, हुजेफा युनूस शेख , शाहीद अबुल कसीम शेख, आसीम अब्दुल्ला शेख, वसीम अब्दुल्ला शेख सर्व रा. मशीद अली वाडा, एरंडोल यांनी शेख शकील शेख लतीफ याच्या नावावर असलेली जमीन दिशाभूल करून खरेदी केली होती, या व्यवहाराच्या विरोधात शेख शकील यांनी जळगाव न्यायालयात लेखी अर्ज केला होता. याचा राग मनात धरून १७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सर्वांनी मिळून शिवीगाळ करून वाद घातला. यात शेख शकील यांच्यासह त्यांची आई सईदा बी शेख लतीफ आणि बहीण शबाना बी शेख लतीफ यांना हातातील लाकडी काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.




