मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शहरातील एका महाविद्यालयात पिडी मुलगी ही आवारात असतांना संशयित आरोपी यशवंत शिवदास इंगळे (रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) याने पिडीत मुलीचा रस्ता अडवला. “तू माझ्यावर प्रेम का करत नाही? माझ्याशी का बोलत नाही?” असे म्हणत त्याने पीडितेचे केस ओढून तिच्या गालावर चापट मारली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने तिला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी यशवंत इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील ताास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.




