जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावात किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुन्नस देणे आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून ही घटना रविवारी १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. यात लोखंडी रॉड आणि विळ्याचा वापर करून गंभीर दुखापत करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात रविवारी १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खुन्नस आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून गॅरेज मालक शेख सलीम शेख लतीफ (वय ५४, रा. भादली रोड) याला शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपी जाहीद शेख रऊफ यांच्यासह त्याचेसोबत असलेले ७ जणांनी हातात लोखंडी रॉड आणि लोखंडी विळा घेवून येवून शेख सलीम शेख लतीफ याच्यावर हल्ला चढविला.

हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या शेख सलीम शेख लतीफ याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे जाहीद शेख रऊफ, रऊफ शेख समद, अमजद शेख समद, मुस्तकीम शेख समद, अर्शद शेख रऊफ, फैजान शेख रऊफ, शेख नसरीन बी शेख रऊफ आणि फतीमा बी शेख मुस्तकीम (सर्व रा. आसोदा, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देविदास चिंचोरे हे करीत आहे.



