Home क्राईम कुरियरचे पाच महागडे मोबाईल लंपास; १ लाख ७९ हजारांचा ऐवज लांबविला

कुरियरचे पाच महागडे मोबाईल लंपास; १ लाख ७९ हजारांचा ऐवज लांबविला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वर्दळीच्या आकाशवाणी चौकातील श्रीस्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून कुरियरचे पाच महागडे मोबाईल असा एकुण १ लाख ७९ हजार ८९६ रूपयांची ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ मार्च रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कंडारी येथील रहिवाशी असलेले भूषण रमेश पाटील (वय ३०) हे कुरियर सेवेचे काम करतात. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ते आकाशवाणी चौकातील श्रीस्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोर आले होते. यावेळी त्यांनी त्यांचे कुरियरचे बॉक्स ऑफिससमोर ठेवले होते. मात्र, कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुरियरच्या बॉक्समधील पाच महागडे मोबाईल चोरून नेले. चोरट्यांनी पळवलेल्या मालामध्ये १ लाख ७९ हजार ८९६ रुपये किमतीचे पाच मोबाईल संच आहेत.

याबाबत भूषण पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक नरेश सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound