जळगाव प्रतिनिधी । मराठी प्रतिष्ठानच्या महोत्सवात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी एकमेकांना भजी भरवून पावसाळ्याचा आनंद लुटला.
मराठी प्रतिष्ठानतर्फे गत तीन वर्षांपासून भजी महोत्सव आयोजित केला जात आहे. यातील पहिल्याच महोत्सवात नाथाभाऊ आणि सुरेशदादा या कट्टर राजकीय विरोधकांनी एकमेकांना भजी भरवल्याने राजकीय वर्तुळात धमाल उडाली होती. या पार्श्वभूमिवर, आज मेहरूण तलावावरील कार्यक्रमात ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी एकमेकांना भजी भरवून पावसाळ्याचा आनंद लुटला. याप्रसंगी माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी प्रतिष्ठानचे विजय वाणी आणि जमील देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/650612305444148/