Home क्राईम ऊसतोडीच्या पैशांवरून मजूराला काठीने बेदम मारहाण; गुन्हा दाखल

ऊसतोडीच्या पैशांवरून मजूराला काठीने बेदम मारहाण; गुन्हा दाखल


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऊस तोड केलेल्या कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका मजुराला बेदम मारहाण केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलमान कालु तडवी (वय-३३, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी संशयित आरोपी फारुख नशीब तडवी (रा. पिंपळगाव हरे) याच्याकडे आपल्या हक्काचे ऊसतोडीचे पैसे मागितले होते. मात्र, हक्काचे पैसे मागितल्याचा राग आरोपीला आला. या रागातून संशयित आरोपी फारूख तडवी याने सलमान तडवी यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी फारूख तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पांडूरंग गोरबंजारा हे करीत आहे.


Protected Content

Play sound