Home Cities एरंडोल वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई ; गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई ; गुन्हा दाखल

0
140


एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यात अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. रिगणगाव शिवारात विना परवाना बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर एरंडोल पोलिसांनी पकडला असून, या प्रकरणी एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मौजे रिगणगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी वैभव श्रीराम पांढरे (वय-४१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रिगणगाव येथे बेकायदेशीर वाळूची विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी वाळूने भरलेले वाहन पोलीसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक फारूक हरून पटेल (वय २९ वर्ष, रा. रिगणगाव, ता. एरंडोल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound