Home क्राईम पहूर येथे बंद घरातून दीड लाखांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल

पहूर येथे बंद घरातून दीड लाखांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल

0
125


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर ता. जामनेर येथील लेलेनगर भागात भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका मजुराच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी पाहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताराचंद बाबुलाल भोई (वय ५२, रा. लेलेनगर, पहूर ता. जामनेर) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर गेले असताना, ७ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची अंगठी, चांदची कडी, जोडवी, चांदीच्या पट्ट्या आणि ३० हजारांची रोकड असा एकुण १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound