Home धर्म-समाज यावलमध्ये धुलीवंदनाचा जल्लोष; आमदार अमोल जावळे तरुणांसोबत रंगले नृत्यात

यावलमध्ये धुलीवंदनाचा जल्लोष; आमदार अमोल जावळे तरुणांसोबत रंगले नृत्यात


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात धुलीवंदनाचा सण यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील द बेस्ट फ्रेंडस ग्रुप आणि आर. के. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू सम्राट मॉल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धुलीवंदन कार्यक्रमाला नागरिकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रंगांची उधळण, डीजेच्या तालावर नृत्य आणि आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमस्थळी डीजेच्या तालावर युवक आणि बालमित्र मंडळ उत्साहाने नाचताना दिसत होते. रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांवर रंग उधळत सर्वांनी जल्लोषात सहभाग घेतला. परिसरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी जवळपास एक तास तरुणांसोबत धुलीवंदनाचा आनंद लुटला. उत्साहाच्या भरात आमदार अमोल जावळे यांनीही डीजेच्या तालावर तरुणांसोबत नृत्य करत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी उपस्थित युवकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, डॉ. कुंदन फेगडे, नगरसेवक उमेश फेगडे, बाळासाहेब फेगडे, योगेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, आकाश चोपडे, रुबाब तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, रोशन येवले, डॉ. धीरज चौधरी, खरेदी-विक्री संघाचे व्हाइस चेअरमन अतुल दादा भालेराव, गणेश महाजन, भूषण फेगडे, रितेश बारी, उज्ज्वल कानडे, चेतन आढळकर, सरपंच परिषदेचे संदीप भैय्या सोनवणे, विलास चौधरी, चेतन फेगडे, प्रशांत रणधिरे, अभय शेठ जंगले, आशिष पाटील,  दिलीप वाणी, समाधान राजपूत, संजय फेगडे, गणेश येवले, जुगल पाटील, रमेश जोगी, मयूर कानडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी गोड दुधातील बासुंदीची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी एकत्र येऊन बासुंदीचा आस्वाद घेत धुलीवंदनाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


Protected Content

Play sound