Home क्राईम अश्लील वर्तन करत महिलेचा विनयभंग; एकावर एक गुन्हा दाखल

अश्लील वर्तन करत महिलेचा विनयभंग; एकावर एक गुन्हा दाखल


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपल्या मुलाला विनाकारण त्रास देणाऱ्या तरुणाची समजूत काढण्यासाठी आणि त्याच्या पालकांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामदा येथील रहिवासी संशयित आरोपी गणेश राजेंद्र कोळी हा पीडित महिलेच्या मुलाला वारंवार त्रास देत होता. मुलाला होणारा हा त्रास थांबवण्यासाठी पीडित महिला आरोपीच्या घरी त्याला व त्याच्या वडिलांना समज देण्यासाठी गेली होती. मात्र, आपल्या घरी तक्रार घेऊन आल्याचा राग मनात धरून गणेश कोळी याने फिर्यादीशी वाद घातला.

रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीचा हात पकडून त्यांच्याशी अश्लील वर्तन केले, ज्यामुळे त्यांच्या लज्जेला बाधा निर्माण झाली. एवढेच नव्हे तर, आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने तात्काळ मेहुणबारे पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. याप्रकरणी मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound