Home क्राईम बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र चोरी : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र चोरी : चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपाली सुनील पाटील (वय ४०) या १ मार्च रोजी दुपारी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले.

गर्दीमुळे चोरी कधी झाली हे त्यांना समजले नाही. नंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound