Home क्राईम डिकसाई परिसरातून ७ जनावरांची चोरी ; ६५ हजारांचे नुकसान

डिकसाई परिसरातून ७ जनावरांची चोरी ; ६५ हजारांचे नुकसान


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिकसाई गावातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या गोठ्यातून तब्बल ७ जनावरे चोरून नेल्याची धक्कादायक घटना १५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनीवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे सोनू श्रीराम पाटील वय ३८ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सोनू पाटील व गावातील रहिवाशी कैलास पाटील यांच्या मालकीच्या ६५ हजार रूपये किंमतीच्या ७ जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर शेतकऱ्यांनी गुरांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound