चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याची आणि तिला मारहाण केल्याची घटना गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता मेहुणबारे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेवीस वर्षीय पिडीत महिला ही चाळीसगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्याला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडित महिला ही आपल्या राहत्या घरी असताना,संशयित आरोपी आरोपी पवन सुनील बच्चे (रा. पोहरे, ता. चाळीसगाव) हा महिलेच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. पीडितेचा हात पकडून “तू माझ्यासोबत चल” असे म्हणत अश्लिल चाळे करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पिडीत महिलेने याला नकार दिल्याने त्याने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी पवन बच्चे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ विश्वास देशमुख करत असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.




