ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी ; राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जींची भेट

32d94eda 81ec 4c6c 96af 1e91b9bacd3c

 

मुंबई (वृत्तसंस्था) ईव्हीएमविरोधात मोर्चाबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भेटणार असल्याचे वृत्त आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जवळपास दीड महिन्यांनी पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे निवेदन राज ठाकरे यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिले होते. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचेही चर्चा होती. आता ईव्हीएमचा मुद्दा घेऊनच ते ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात ईव्हीएमवरून मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

Protected Content