मुंबई-वृत्तसेवा | टेक कंपनी मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, एप्रिल 2026 नंतर युजर्स मेसेंजर.कॉमद्वारे चॅटिंग करू शकणार नाहीत. वेबवरील सर्व संभाषण आता थेट फेसबुकच्या वेब इंटरफेसवर केले जाईल.
एप्रिल २०२६ नंतर मेसेंजर.कॉम उघडल्यास यूजर ऑटोमॅटिकली फेसबुक.कॉम/मेसेंजरवर रीडायरेक्ट होतील. मोबाईल युजर्ससाठी मेसेंजर अॅप पुन्हा जसा आहे तसा चालू राहील. फेसबुक अकाऊंट डिएक्टिवेट केलेल्या युजर्ससाठी आता केवळ मोबाईल अॅपद्वारेच चॅटिंग शक्य होईल.

चॅट हिस्ट्री सुरक्षित ठेवण्यासाठी पिनद्वारे बॅकअप घेता येईल आणि पिन विसरल्यानंतर रीसेट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मेटाने विंडोज आणि मॅकसाठी वेगळे मेसेंजर डेस्कटॉप अॅप्स आधीच बंद केले आहेत, आणि त्यावेळी युजर्सना फेसबुक वेब इंटरफेसवर शिफ्ट केले गेले होते.
मेसेंजरची सुरुवात 2008 मध्ये फेसबुक चॅट म्हणून झाली होती. 2011 मध्ये हे वेगळे अॅप झाले आणि 2024 मध्ये फेसबुक अॅपमधून मेसेजिंग फीचर्स काढले गेले. 2023 पासून पुन्हा मेसेंजर फीचर्स फेसबुक अॅपमध्ये एकत्रित होत आहेत. वर्तमानात वेबसाईट बंद होण्याच्या निर्णयामुळे काही युजर्स नाराज आहेत. विशेषतः फेसबुक अकाऊंट बंद केलेले पण मेसेंजर वेब वापरणारे युजर्स या बदलामुळे अडचणीत आहेत.



