पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून वाद उकरून काढत एका तरुणाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जिलानी गंभीर तडवी (वय ३० वर्ष, रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) हे २४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाजार पट्टा परिसरातून जात होते. यावेळी आरोपी साहिल गुलाब तडवी याने फिर्यादीला जोरात धक्का दिला. “मला धक्का का दिला?” अशी विचारणा जिलानी यांनी केली असता, आरोपी साहिलला त्याचा प्रचंड राग आला. या रागातून जिलनी तडवी यांला साहिल तडवी याने शिवीगाळ करत हातातील दगड डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. एवढेच नापही तर त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे हे करीत आहे.




