Home क्राईम भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली !

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहन नगरात दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन ओढून चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील देवेंद्र नगरात राहणाऱ्या सिमा हसमुख सुर्यवंशी वय ४३ या महिला रविवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या स्कूटीने घरी जात असतांना मोहन नगरातील हिरकणी डेअरी जवळ दुचाकीने मागून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी सिमा सुर्यवंशी यांच्या गळ्यातील ४२ हजार रूपयांची सोन्याची चैन जबरी हिसकावून लंपास केली. महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे घटनास्थळाहून पसार झाले होते. याप्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी दोन जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound