यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा-यावल विधानसभा मतदारसंघातील यावल तालुक्यात विकासकामांचा वेग वाढला असून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विविध कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये आयोजित कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे स्मशानभूमीत सांत्वनशेड बांधकामासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. किनगाव खुर्द येथेही स्मशानभूमीतील सांत्वनशेडसाठी दहा लाख रुपये मंजूर झाले असून कामाचा शुभारंभ करण्यात आला. चुंचाळे येथे स्मशानभूमीत सांत्वनशेड बांधकामासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिरसाड येथे स्मशानभूमी बांधकामासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचेही भूमिपूजन पार पडले.

मनवेल येथे सांत्वनशेड बांधकामासाठी दहा लाख रुपयांची योजना राबविण्यात येत असून थोरगव्हाण येथे स्मशानभूमी बांधकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बोराडे येथे २० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले, तर शिरसाड येथे वीस लाख रुपये निधीतून उभारलेल्या बौद्ध विहाराचेही लोकार्पण सोहळा पार पडला. थोरगव्हाण ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बबलू कोळी, मुन्ना पाटील, सूर्यभान पाटील, भरत चौधरी, समाधान सोनवणे, विकास साळुंखे, गोटू सोनवणे, दीपक कोळी, विनायक पाटील, दिनू महाजन, विनोद खेवलकर, गोकुळ कोळी, दिनेश साळुंखे, बाळा सोनवणे, संजय पाटील, कलिंदर तडवी, बाळू पाटील, दीपक तायडे, फिरोज तडवी, सुधाकर पाटील, कुर्बान तडवी, पवन पाटील, अशोक हटकर, सोनू माळी आदी मान्यवर उपस्थित होते. गावागावांत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले.
विकासकामांमुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा बळकट होणार असून स्मशानभूमी, बौद्ध विहार व ग्रामपंचायत इमारतींसारख्या आवश्यक सुविधांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे यावल तालुक्यात विकासाची गती कायम राहील, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.



