Home क्राईम वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे परिसरात बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि अवैध वाळू असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील करगाव गावी वडगाव लांबे रोडवर भिलाटी भागातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरवर कारवाई केली. त्यावेळी गणेश ज्ञानेश्वर पाटील (वय २१, रा. वडगाव लांबे, ता. चाळीसगाव) हा अवैधरित्या विना क्रमांकाच्या वाहनातून वाळू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करत ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक गणेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे हे करीत आहे.


Protected Content

Play sound