Home Uncategorized डॉ. वर्षा पाटील कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन तेजस्विता २०२६चा प्रारंभ

डॉ. वर्षा पाटील कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन तेजस्विता २०२६चा प्रारंभ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन तेजस्विता २०२६ उत्साहात सुरू झाले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नयना झोपे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके देखील उपस्थित होत्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग व टीमवर्कबाबत मार्गदर्शन केले.

तेजस्विता २०२६ कार्यक्रम २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, या पाच दिवसांच्या स्नेहसंमेलनात प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे), मिस मॅच डे अँड किड्स डे, रांगोळी स्पर्धा, चॉकलेट डे, मेहंदी डे, ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स, सोशल अ‍ॅक्टिव्हिटी, कल्चरल डे, डान्स, सिंगिंग आणि ड्रामा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांचे नियोजन प्रा. ऋतुजा नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिभेची जोपासना करण्यासाठी व अनुभव मिळवण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची उत्साही उपस्थिती पाहायला मिळाली, तसेच शिक्षक व व्यवस्थापनाने त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतून फक्त शैक्षणिकच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि शारीरिक विकासासाठीही महत्त्वपूर्ण अनुभव घेतला. उपस्थित मान्यवरांनी या स्नेहसंमेलनाचे कौतुक केले व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 


Protected Content

Play sound