यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात लावलेली ईलेक्ट्रीक पाण्याच्या मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा वीजेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात घडली आहे. याबाबत गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण अनिल सोनवणे वय २६ रा. डोंगर कठोरा ता. यावल असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात भूषण सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात पाण्याचे नळ आल्याने भूषण हा पाणी भरण्यासाठी घरात असलेले ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो बाथरूममध्ये फेकला गेला. त्यावेळी त्याला नातेवाईकांनी तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश महाजन हे करीत आहे.




