Home Cities यावल जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात 

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांतून शिवरायांप्रती आपला आदर व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष सौ. रंजना महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे, पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड व श्रीमती राजश्री लोखंडे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

सेमी माध्यम व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित माहितीपर भाषणे सादर केली. साकेत अभिजीत जाधव, स्वराज मंदार गडे, गार्गी धनराज तळेले, विवेक योगेश लावणे, ओवी विशाल महाजन, तनिष्का प्रवीण चौधरी, प्रितेश प्रशांत बरगे, निखिल श्रीकृष्ण नेहते, समृद्धी निलेश बारी, कल्याणी पंकज बारी, महेश्वरी सुनील कुंभार आणि सुदिक्षा दिनकर बारी या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरित केले. सम्यक सौरभ जैन या विद्यार्थ्याने शिवरायांवरील गीत सादर करून कार्यक्रमात देशभक्तीची भावना जागवली.

कार्यक्रमादरम्यान ऋषी नितीन माहूरकर, वेदांत अमृत पाटील आणि गायत्री सचिन चौधरी यांनी शिवगर्जना सादर केली. हेमाक्षी मनोज पाटील, अंकिता जगदीश गायकवाड आणि धनश्री राजेंद्र पाटील यांनी पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. शिवराय, जिजामाता आणि मावळे यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून कार्यक्रमात विशेष रंग भरला.

प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्राची प्रेरणादायी माहिती दिली, तर शिक्षिका डिंपल इंगळे यांनीही शिवरायांच्या पराक्रमाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती भंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मी कवडीवाले यांनी मानले.


Previous articleबोगस केळी विमा प्रकरणांची जोरदार चर्चा ; शेतकरी संतप्त 
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound