मुंबई-वृत्तसेवा । शिवजयंतीच्या औचित्य साधत शिवजागर प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी एक विशेष व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दीपक पवार हे ‘छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्र?’ या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समकालीन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम बालभवन, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार असून, डोंबिवली परिसरातील शिवप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी ८६९३०८५५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




