Home धर्म-समाज आदिवासी एकता मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मेहरबान तडवी यांची निवड

आदिवासी एकता मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मेहरबान तडवी यांची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी समाजाच्या हक्क, न्याय व सर्वांगीण विकासासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करणाऱ्या आदिवासी एकता मंच महाराष्ट्र या संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक यावल येथील लोकेशनगर परिसरात उत्साहात पार पडली. बैठकीत जळगाव जिल्ह्यासह विविध तालुक्यांची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून मेहरबान तडवी यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

बैठकीला राज्याध्यक्ष एम. बी. तडवी, राज्य उपाध्यक्ष सलीम भुरेखा, राज्य सचिव इब्राहिम तडवी, राज्य सदस्य जहांगीर तडवी तसेच राज्य महानिरीक्षक मनीष तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर या तालुक्यांसाठी नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

जिल्हाध्यक्षपदी मेहरबान तडवी यांची निवड होताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. किनगाव येथील सबदल तडवी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मोहरद येथील फरीद तडवी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. पाल येथील सलीम तडवी यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली. चिंचाळे येथील फतू रज्जाक तडवी यांची जिल्हा सचिवपदी, भालोद येथील जुम्मा तडवी यांची जिल्हा सहसचिवपदी, तर एरंडोल येथील वसीम तडवी यांची जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली.

तालुका स्तरावरही विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. नायगाव येथील युसूफ तडवी यांची यावल तालुका अध्यक्षपदी, धानोरा येथील वसीम तडवी यांची चोपडा तालुका अध्यक्षपदी, जीन्स येथील लतिफ तडवी यांची रावेर तालुका अध्यक्षपदी निवड झाली. यावल शहराध्यक्षपदी शाहरुख तडवी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच फिरोज तडवी, याकूब तडवी (अकलूज) यांची यावल तालुका उपाध्यक्षपदी, जाबीर तडवी यांची रावेर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. दगडू तडवी, रहीम तडवी, पीरन तडवी यांची तालुका सदस्यपदी निवड झाली. आडगाव शाखा अध्यक्षपदी मज्जित तडवी तर वाघ गिरा शाखा अध्यक्षपदी किरण तडवी यांची नियुक्ती करण्यात आली.

सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध व एकमताने झाल्याने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मेहरबान तडवी यांनी वडरी (ता. यावल) येथे या वर्षी समाज मेळावा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजुरी दिली. ईदनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मेळावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे यंदाचा मेळावा मार्च महिन्यात वडरी येथे होणार आहे.

या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष संजू तडवी, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रशीद तडवी, यावलचे माजी तालुका अध्यक्ष अशपाक तडवी, जिल्हा सदस्य सचिन तडवी, सेवानिवृत्त टी.सी. अकबर तडवी, बाबू तडवी, कुर्बान भाऊ तडवी, जिनसी अकबर तडवी, सलमान तडवी (भुसावळ), महिला जिल्हाध्यक्ष मुन्नाताई तडवी, जिल्हा उपाध्यक्ष रेहाना ताई तडवी, जिल्हा सचिव सामना ताई तडवी, यावल तालुका अध्यक्ष जुबेदा तडवी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष निरीक्षक म्हणून पत्रकार मासूम तडवी व पत्रकार फिरोज तडवी यांनीही उपस्थिती दर्शवली.

माजी जिल्हाध्यक्ष सलीम तडवी तसेच माजी जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन कार्यकारणीच्या स्थापनेमुळे आदिवासी समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound