Home क्राईम न्यायालय आवारातून दुचाकी लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद !

न्यायालय आवारातून दुचाकी लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत एका सराईत मोटारसायकल चोरट्याला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या असून, त्यातील एक दुचाकी चक्क गुजरात राज्यातील सुरत येथून चोरण्यात आली होती.

अशी आहे घटना :
३ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारातून ॲडव्होकेट रोकडे यांची हिरोहोंडा एच.एफ. डिलक्स (क्र. MH 39/T 6102) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तपासाचे आदेश दिले होते.

तपास आणि अटक :
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ शहराचे निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, किरण उर्फ करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कोर्ट आवारातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

आंतरराज्य गुन्ह्याचा पर्दाफाश :
आरोपीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने गुजरात राज्यातील सुरत येथील अलथान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक होंडा शाईन (क्र. जीजे 05 एनए 6180) चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी ही दुचाकी देखील जप्त केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी मलकापूर आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी :
ही यशस्वी कामगिरी एलसीबीचे उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल भंडारे, राहुल भोई व नितीन चौधरी यांच्या पथकाने केली आहे. दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound