Home क्राईम चोपडा शहरात चोरट्यांचा हैदोस ; दोन लाखांचा ऐवज लंपास

चोपडा शहरात चोरट्यांचा हैदोस ; दोन लाखांचा ऐवज लंपास


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, इंदिरा नगर आणि परिसरात चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली आहेत. यात विजय गंगाराम बारेला यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय बारेला (वय ३६) हे आपल्या कुटुंबासह चोपडा शहरातील इंदिरा नगर, साईराज पार्क परिसरात राहतात. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी वेजापूर येथे गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे मणी, सोन्याची पोत, झुमके, मंगळसूत्र, चांदीची चैन आणि ५ हजार रोख असा एकूण २ लाख २ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला.

धक्कादायक बाब म्हणजे, केवळ बारेला यांचेच घर नव्हे तर याच कॉलनीतील रहिवासी राजेंद्र संभाजी गवळी आणि शाम यादव छापेकर यांच्या घरातही त्याच वेळी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी विजय बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे करत आहेत.


Protected Content

Play sound