मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पवित्र महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र चांगदेव येथे भगवान महादेव आणि संत श्री चांगदेव महाराज यांच्या महापूजेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून महादेवाचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजन केले.
अभिषेक आणि प्रगतीसाठी प्रार्थना :
पहाटेपासूनच चांगदेव मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर त्यांनी भगवान भोलेनाथ आणि संत चांगदेव महाराज यांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. “मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती नांदो आणि सर्वांची प्रगती व्हावी,” असे साकडे त्यांनी यावेळी देवाच्या चरणी घातले.

भक्तिमय वातावरणात ‘हर हर महादेव’चा जयघोष :
महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. उपस्थित भाविकांच्या ‘हर हर महादेव’ आणि ‘जय चांगदेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
मान्यवरांची उपस्थिती :
या धार्मिक सोहळ्याप्रसंगी विनोद तराळ, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, चांगदेवचे सरपंच निखिल बोदडे, शिवसेना तालुका संघटक वसंत भलभले, उपसरपंच दत्तू चौधरी, जे.के. चौधरी, कैलास कोळी, सुपडू बोदडे, अक्षय चौधरी, अमन शेजोळे, ईश्वर म्हस्के, स्वप्निल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. “महादेवाची कृपा सर्वांवर राहो,” अशी भावना यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.



