Home धर्म-समाज चांगदेव येथे महाशिवरात्रीचा उत्साह ; श्री संत चांगदेव महाराज मंदिरात महापूजा

चांगदेव येथे महाशिवरात्रीचा उत्साह ; श्री संत चांगदेव महाराज मंदिरात महापूजा


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मुक्ताईनगर जवळील प्रसिद्ध श्री संत चांगदेव महाराज मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिराचा परिसर भक्तांच्या गर्दीने आणि भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता.

पारंपरिक महापूजा आणि अभिषेक
महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री संत चांगदेव महाराजांची पहिली आरती मोठ्या भक्तीभावात पार पडली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘हरिनामाचा गजर’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

परंपरेचा मान आणि वारसा
यावर्षी महाशिवरात्रीची पहिली आरती करण्याचा बहुमान अंकुश राजेंद्र चौधरी यांना सपत्नीक मिळाला. विशेष म्हणजे, चौधरी परिवाराला पिढ्यानपिढ्या ही पहिली आरती करण्याचा मान मिळत असून, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि अखंडितपणे जपली जात असल्याचे पाहायला मिळाले.

भाविकांची मांदियाळी आणि महाप्रसाद
महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे चांगदेव नगरीत उत्सवाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून आणि मंदिर समितीकडून गर्दीचे नियोजन चोख ठेवण्यात आले होते.


Protected Content

Play sound