Home धर्म-समाज मुक्ताईनगरात बालकीर्तनकाराच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

मुक्ताईनगरात बालकीर्तनकाराच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री विष्णू भगवान संस्थान, चौथा जिल्हा बुलडाणा यांच्या वतीने आयोजित पायी दिंडी पालखी सोहळा चौथा ते मुक्ताईनगर असा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसर दिंडीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

या सोहळ्यात ह.भ.प. दर्शन महाराज हिवाळे (वय ७, पिंपळगाव देवी, जि. बुलडाणा) यांचे प्रभावी कीर्तन संपन्न झाले. अल्पवयातही त्यांनी अत्यंत ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण शैलीत संतविचार, नामस्मरण व भक्तीचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांच्या निरागस परंतु प्रभावी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनादरम्यान हरिनामाच्या गजरात वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

पालखी सोहळ्याचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सुरळीत पार पडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

या मंगल प्रसंगी पवार कुटुंबास कीर्तनसेवेचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी संस्थान व कीर्तनकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भक्तीभाव, एकोपा आणि संतपरंपरेची जपणूक करणारा हा सोहळा मुक्ताईनगरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.


Protected Content

Play sound