जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी बुद्रुक गावातील श्रीकृष्ण नगर येथील एकाचे बंद घर फोडून घरातून ७ हजार रूपयांची रोकडची चोरी केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी बुद्रुक गावात विकास जगन्नाथ भोळे वय ३२ हे वास्तव्याला आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटाची झडती घेऊन त्यात ठेवलेली ७ हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी रामकृष्ण पाटील हे करीत आहे.




