Home धर्म-समाज पारोळ्यात लाडशाखीय वाणी समाजाच्या अध्यक्षपदी सुनंदा शेंडे यांची निवड

पारोळ्यात लाडशाखीय वाणी समाजाच्या अध्यक्षपदी सुनंदा शेंडे यांची निवड

0
121


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुनंदा शेंडे यांची निवड करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. समाज मंगल कार्यालयात माजी अध्यक्षा प्रा. वर्षा पुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पुढील वर्षासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ हे धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले सक्रिय मंडळ म्हणून ओळखले जाते. विविध समाजोपयोगी उपक्रम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच परंपरेला पुढे नेत नव्या कार्यकारिणीची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सुनंदा शेंडे, उपाध्यक्षपदी हेमलता चांदवडे, सचिवपदी ज्योती शिनकर, तर खजिनदारपदी सुनिता भामरे यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून दिपिका शेंडे, शितल टिपरे, वृषाली मालपुरे, नीता नावरकर, रुपाली शिरोळे, अर्चना मैंद, विद्या येवले, रुणल कोतकर, वंदना शेंडे, उषा शेंडे, वर्षा कोठावदे, माधुरी अमृतकर आणि योगीता येवले यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन अध्यक्ष सुनंदा शेंडे यांनी निवडीनंतर बोलताना भविष्यात अधिकाधिक चांगले सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. महिला सक्षमीकरण, समाजातील गरजू घटकांना मदत आणि सांस्कृतिक वारसा जपण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या निवडीबद्दल लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष विजय नावरकर, अखिल भारतीय वाणी प्रबोधन मंडळाचे तालुका अध्यक्ष हेमकांत मुसळे, तालुका प्रबोधन महिला अध्यक्षा पुष्पा भोकरे, शहराध्यक्ष चंद्रकला पिंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजकार्यात अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound