Home धर्म-समाज वाघोदे बु येथे श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन भक्तिभावात साजरा 

वाघोदे बु येथे श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन भक्तिभावात साजरा 


वाघोदे बु. ता. रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील वाघोदेबु गावात श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकटदिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या सलग १६ वर्षांपासून राजाराम पवार, माऊली भजनी मंडळ आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या धार्मिक उपक्रमामुळे संपूर्ण गावात भक्तीमय आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

नेहमीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त दर्शन सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांची गर्दी मंदिर परिसरात दिसून येत होती. गावकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांचे सपत्नीक दर्शन घेत होते आणि आशीर्वाद लाभवत होते.

या कार्यक्रमास सिंगनुर येथील भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. मायाताई संजय मोरे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी गावकऱ्यांसमवेत श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन प्रकटदिन सोहळ्यात सहभाग नोंदविला.

यावेळी प्रा. संजय मोरे यांनी श्री संत गजानन महाराजांच्या मुख्य घोषवाक्याचा उल्लेख करत “गण गण गणांत बोते” या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात केली. हा नाममंत्र केवळ उच्चारापुरता मर्यादित नसून, तो महाराजांच्या जीवनतत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. कर्म, भक्ती आणि योग यांच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करून जीवनाचे कल्याण साधणे, हाच या मंत्रामागील खरा आशय असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या १४८ व्या प्रकटदिन सोहळ्यात जेष्ठ नागरिक राजाराम पवार, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्ष गयाबाई पवार, प्रगतशील शेतकरी विजयकुमार बाजीराव पाटील यांच्यासह सौ. मायाताई मोरे, इंदुबाई वायके, शकुंतला वानखेडे, ऐश्वर्याताई महाजन, बेबाबाई पवार, गोपाबाई भगत, यमुनाबाई महाजन, विजयाबाई, जी. आर. महाजन, एस. एम. चौधरी, बाजीराव महाजन, अनिल पवार, राहुल पाटील, कमलाकर माळी, शांताराम पवार, पद्माकर काळे, गोविंदा महाजन, विनोद महाजन, कुलभूषण पाटील, दत्ता पाटील, विजय मोरे, राजू तायडे आदींसह गावातील महिला भजनी मंडळ, भजनी मंडळ, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound