Home क्राईम पारोळा बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट : तीन महिलांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी

पारोळा बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट : तीन महिलांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मुख्य बसस्थानकावर प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी हर्षदा शशिकांत पाटील (वय ४२, रा. सडावण, ता. पारोळा) या लोणी बसमध्ये प्रवास करण्यासाठी पारोळा बसस्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना किंवा बसमध्ये असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि मणी लंपास केले.

केवळ हर्षदा पाटीलच नव्हे, तर त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन महिलांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. अंजना संजीव मोरे यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सरला विलास पाटील यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे २.५ ग्रॅमचे दागिने अशा प्रकारे एकूण ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने अत्यंत शिताफीने लंपास केला.

दुपारच्या सुमारास दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलांनी पारोळा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी हर्षदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. चंद्रशेखर सोनवणे करत आहेत.

 


Protected Content

Play sound