कॅनडा वृत्तसंस्था । भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज (दि.25 जुलै) पासून ग्लोबल ट्वेंटी-20 व युरो ट्वेंटी-20 या लीगला सुरुवात होत असून युवराज या लीगमध्ये खेळणार आहे. हा पहिल्याच असा सामना असेल ज्यात युवराज विरुद्ध गेल्याचे पाहायला मिळणार आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 10 वाजता सुरु होणार आहे. माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्यामुळे युवीनं आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मुळात त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी हवी होती. त्यासाठीच त्यानं निवृत्ती पत्करली. आता ग्लोबल ट्वेंटी-20 लीगनंतर युवी युरो ट्वेंटी-20 लीगमध्येही खेळणार असल्याचे समजत आहे. ही लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथे 30 ऑगस्ट व 22 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. युवराज हा टोरोंटो नॅशनल संघाचे प्रतिनिधित्व करतो, तर गेल हा व्हँकोव्हर नाइट्सकडून खेळणार आहे. या लीगचा सलामीचा सामना उभय संघांमध्येच होणार आहे. या सामन्यापूर्वी युवी आणि गेल यांनी एकमेकांना चॅलेंज केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात कोण बाजी मारतो, याची उत्सुकता लागली आहे.