Home क्रीडा साकेगाव प्रीमियर लीगच्या सीझन-२ चा शुभारंभ

साकेगाव प्रीमियर लीगच्या सीझन-२ चा शुभारंभ


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराजवळील साकेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सी.सी. तर्फे आयोजित ‘साकेगाव प्रीमियर लीग (एसपीएल) सीझन-२’ ला बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी झालेल्या रंगतदार सामन्यांमध्ये ९३ किंग्स, योद्धा आणि पूर्वा या संघांनी विजय मिळवत स्पर्धेत दमदार सलामी दिली. मैदानावर खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांची उसळलेली गर्दी आणि थेट प्रक्षेपणामुळे स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound