Home क्राईम घरात घुसून महिलेचा विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी

घरात घुसून महिलेचा विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी

0
217


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी सुनील भिका कुंभार (रा. ममुराबाद) याने २७ ऑक्टोबर २०२५ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी पीडितेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केला.

त्याने पीडितेला मारहाण केली आणि “मी तुझ्यावर प्रेम करतो, तू तुझ्या पतीला सोडून दे, मी तुझ्याशी लग्न करेन” असे म्हणत दबाव टाकला. पीडितेने नकार दिला असता, आरोपीने तिला व तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुनील भिका कुंभार (रा. ममुराबाद)ब्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. सुनील पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Protected Content

Play sound