Home क्राईम भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा ते डोमगाव रोडवर एका भरधाव बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकारणी अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत संतोष शेकाकोरे (वय २७, रा. वडली, ता. जि. जळगाव) हे सायबर कॅफे चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:०० वाजेच्या सुमारास अनिकेत हे आपल्या मोटारसायकलने (एमएच १९ बीडब्ल्यू ९८४९) डोमगाव फाटा रोडवरून जात होते. यावेळी रस्त्यावरील वळणावर समोरून येणाऱ्या पिकअप बोलेरो गाडीने ( एमएच ४३ बीएक्स ११९०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात यामध्ये अनिकेत यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर बोलेरो चालक घटनास्थळावरून फरार झाला. बोलेरो चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने चालवल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस कारवाई याप्रकरणी अनिकेत शेकाकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound