Home Cities अमळनेर भरधाव चारचाकी वाहन विजेच्या खंब्यावर धडकली; तीन भाविक जखमी !

भरधाव चारचाकी वाहन विजेच्या खंब्यावर धडकली; तीन भाविक जखमी !

0
120

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने कोळदे येथून हनुमंतखेडा येथे जाणाऱ्या भाविकांच्या इको गाडीला अमळनेर रोडवरील कमानी गेटजवळ अपघात झाला. समोरून आलेल्या वाहनामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट विजेच्या खांबावर जाऊन धडकली. या घटनेत फिर्यादीसह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता फिर्यादी रवींद्र गिरासे हे गावातील इतर लोकांसह इको गाडीने (एमएच १८ बीआर ८४३०) देवदर्शनासाठी निघाले होते. सकाळी ११:३० च्या सुमारास कमानी गेटजवळ समोरून ‘छोटा हत्ती’ गाडी आल्याने इको चालक कल्याण गुलाब गिरासे याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी वेगात असल्याने ती थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळली.

या अपघातात रवींद्र गिरासे, लताबाई पाटील आणि हिम्मत पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खाजगी वाहनाने अमळनेर आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound