Home क्राईम गुरांची अवैध वाहतूकीचा डाव उधळला; २ जनावरे दगावली, २७ गुरांची सुटका

गुरांची अवैध वाहतूकीचा डाव उधळला; २ जनावरे दगावली, २७ गुरांची सुटका


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील नागळवाडी ते वराड रोडवर अवैध रित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप गाड्या पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडल्या आहेत. कारवाई दरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी, पोलिसांनी तब्बल ११ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील नागळवाडी ते वराड रोवरून अवैधपणे गुरांची वाहनातून वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चोपडा शहर पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी यांची चौकशीला सुरूवात केली आणि ३१ जानेवारी रोजी पहाटे ७ वाजता पोलीसांनी सापळा रचला. त्यावेळी दोन महिंद्रा पिकअप गाड्यांमधून (क्रमांक MP 04 GA 3511 आणि MP 12 GA 0193) गोऱ्हे अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेले जात होते. गावकऱ्यांनी पाठलाग केल्याने आरोपींनी गाड्या भरधाव वेगात चालवल्या, ज्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले. शेवटी आरोपी गाड्या आहे त्या स्थितीत सोडून पळून गेले.

पोलिसांनी तपासणी केली असता, पहिल्या गाडीत १४ गोऱ्हे आणि दुसऱ्या गाडीत १३ गोऱ्हे आढळून आले. दुर्दैवाने, यातील दोन गोऱ्ह्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी एकूण २७ गोऱ्हे आणि दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound