Home उद्योग उद्योजकांसाठी सुवर्णसंधी ! : जळगावात बिझनेस सेमिनारचे आयोजन

उद्योजकांसाठी सुवर्णसंधी ! : जळगावात बिझनेस सेमिनारचे आयोजन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवउद्योजक आणि प्रस्थापित व्यावसायिकांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी ‘एपी कन्सल्टंटस अँड इंजिनिअर्स एलएलपी’ या संस्थेच्या वतीने एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ११ फेब्रुवारी रोजी शहरातील प्रतिष्ठित व.वा. वाचनालयाच्या सभागृहात पार पडणार आहे. या संदर्भात संस्थेचे प्रमुख अजय पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

या सेमिनारविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे प्रमुख अजय पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’शी संवाद साधला. ते म्हणाले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात उद्योजकांना नवनवीन तांत्रिक बदल, सरकारी योजना आणि व्यवस्थापन कौशल्यांची माहिती असणे आवश्यक आहे. जळगावमधील उद्योगांना अधिक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी हा सेमिनार एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.”

या कार्यशाळेत उद्योजकांना प्रकल्पांचे नियोजन, तांत्रिक सल्ला आणि व्यवसाय विस्ताराच्या विविध संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी असून, उद्योजकांनी आपला वेळ राखून ठेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजय पाटील यांनी केले आहे.

शहरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने या सेमिनारला उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, जेणेकरून स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी मदत होईल. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले.


Protected Content

Play sound