चाळीसगाव प्रतिनिधी । येथील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांची पुतणी व विकास जाधव यांची कन्या राजेश्वरी जाधव हिच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आज दरवर्षाप्रमाणे शहरातील बापजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये बाल रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात शहरातील अनेक बाल रुग्णांनी लाभ घेऊन डॉक्टरांच्या योग्य सल्ला व उपचार घेतला. या शिबिराच्या नियोजनात शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील राजपूत यांचे मोठे सहकार्य असल्याचे या ठिकाणी आयोजक रामचंद्र जाधव व जाधव परिवाराच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, आज या रुग्णालयात डॉ. सुनील राजपूत यांच्या आयोजनातून अपघातग्रस्त हॅंडीकॅप लायब्ररी सुरू करण्यात आले असून यात लायब्ररी पद्धतीने वॉकर, काठी, अपंग खुर्ची, तसेच बेड, नाममात्र डिपॉझिट आकारून देण्यात येणार आहे. अपघात ग्रस्त अपंग व्यक्ती पूर्णपणे बरा होऊन पर्यंत ती वस्तू परत आणून द्यायची आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे, असे बाबजी ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य डॉ. संदीप देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी आमदार राजीव देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी कडलक, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर, डॉ. विनोद कोतकर, दैनिक ग्रामस्थांचे संपादक किसनराव जोर्वेकर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सोमसिंग राजपूत, शेखर देशमुख, भगवान राजपूत, साईनाथ देवरे, जगदीश चौधरी, दीपक पाटील, श्याम देशमुख, नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत, नगरसेविका सविता जाधव, स्वयंमदीप संस्थेच्या मीनाक्षी निकम आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थितीत होते.