जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‘हार्ट प्लस’ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय परिचारिकेचा (नर्स) विनयभंग केल्याप्रकरणी आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉ. संदीप भारुडे व डॉ. प्रीती भारुडे यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित परिचारिका संबंधित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. २१ जुलै २०२५ पासून तर २० जानेवारी २०२६ या कालावधीत डॉ. संदीप अशोक भारुडे याने पीडितेशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने तिची छेड काढली. हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने अश्लील चाळे करून तिचा सतत पाठलाग केला. पीडितेने या कृत्यास विरोध दर्शवला असता, डॉ. प्रीती संदीप भारुडे यांनी “जर याबाबत कोणाला सांगितले, तर तुझ्या पतीला आणि मुलांना औषध देऊन मारून टाकू” अशी गंभीर धमकी पीडितेला दिली.

अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने २१ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्रावली असून, महिला पोहेकॉ भारती देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



