पारोळा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पारोळा नगरपरिषदेत सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समितीचे नवनियुक्त सभापती डॉ. मंगेश तांबे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी कडक पावले उचलली. लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आज सकाळी ६ वाजता आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन झाडाझडती करण्यात आली. वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अध्यक्षांच्या अनुमतीने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरात अपेक्षित स्वरूपाची साफसफाई न झाल्याने नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत नाराजी होती. योग्य नियोजनाअभावी निर्माण झालेल्या या स्थितीवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी शहरवासीयांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचाच भाग म्हणून पहिल्याच दिवशी स्वतः शहरात फिरून व्यापक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.

या मोहिमेत तुंबलेल्या गटारी साफ करणे, श्री बालाजी मंदिर परिसरातील साचलेल्या घाणीवर तातडीची उपाययोजना, धरणगाव रोडलगत दलित वस्ती स्मशानभूमी तसेच धरणगाव रोडवरील नवीन स्मशानभूमीपर्यंत साचलेला कचरा उचलणे, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडुपे काढणे आणि ठिकठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग हटविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
लवकरच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात विशेष सफाई व स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, साफसफाई झालेल्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकू नये, तसेच गटाऱ्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती डॉ. मंगेश तांबे यांनी केले आहे. शहराच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून पारोळा स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
टाऱ्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती डॉ. मंगेश तांबे यांनी केले आहे. शहराच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून पारोळा स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



