जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही सर्वसामान्य बाब मानली जात असली, तरी तीव्र व वारंवार होणारी डोकेदुखी कधीही दुर्लक्षित करू नये, असा ठाम इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. अनेकदा साधी वाटणारी डोकेदुखी ही मेंदूच्या गंभीर आजारांची सुरुवातीची घंटा ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील महादेव हॉस्पिटलतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, अत्याधुनिक न्यूरोलॉजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, डोकेदुखीसोबत काही विशिष्ट लक्षणे दिसून आल्यास त्वरित सावध होणे अत्यावश्यक आहे. सतत अशक्तपणा जाणवणे, तीव्र अंगदुखी, दृष्टी धूसर होणे किंवा कमी दिसणे, वारंवार चक्कर येणे, चेहरा किंवा शरीराच्या इतर भागांना मुंग्या येणे, बोलण्यात अडचण येणे अशी लक्षणे मेंदूशी संबंधित गंभीर समस्यांकडे निर्देश करतात. अशा वेळी वेळ न दवडता तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे (दिल्ली) यांची सेवा जळगावकर नागरिकांसाठी उपलब्ध आहे. डॉ. तायडे यांच्या मते, वरील लक्षणे मेंदूला होणारा कमी रक्तपुरवठा, मेंदूतील रक्तस्त्राव, पक्षाघात (स्ट्रोक) किंवा मेंदूतील गाठ (ट्युमर) यांसारख्या आजारांची चिन्हे असू शकतात. वेळेवर निदान व उपचार न झाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जळगाव शहरातील विद्यानगर, आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी विभागात आधुनिक तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध असून, रुग्णांना त्वरित व अचूक उपचार देण्यावर भर दिला जात आहे. अधिक माहितीसाठी प्रा. एन. जी. चौधरी तसेच डॉ. संस्कृती भिरूड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



