Home क्राईम यावलमध्ये ‘गुप्ती’ घेऊन तरुणांचा धिंगाणा; दहशत पसरवणाऱ्या तिघांवर गुन्हा

यावलमध्ये ‘गुप्ती’ घेऊन तरुणांचा धिंगाणा; दहशत पसरवणाऱ्या तिघांवर गुन्हा


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन आरडाओरडा करत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध यावल पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ख्वाजा मशिदीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या तरुणांकडून एक पोलादी गुप्ती आणि इतर साहित्य जप्त केले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील ख्वाजा मशिदीजवळ शनिवारी, १७ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास काही तरुण हातात शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अनिल साळुंखे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अरबाजखान अजमलखान (वय २२, रा. इस्लामपुरा), समशेर संजय तडवी (वय ३०) आणि दगडू कालु तडवी (वय २०, दोघे रा. हरपुरा) हे तिघे हातात ३४ से.मी. लांबीची पोलादी गुप्ती घेऊन फिरताना आढळले. हे तरुण परिसरात आरडाओरडा करत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांच्याकडील स्टीलचे पाते असलेली गुप्ती आणि लोखंडी कव्हर जप्त केले.

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound