Home Cities जळगाव जळगाव महापालिका निवडणूक : आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे कुटुंबीयांसह मतदान 

जळगाव महापालिका निवडणूक : आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे कुटुंबीयांसह मतदान 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. विविध मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असून, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही मतदान करून नागरिकांना प्रेरणा दिली आहे.

जळगाव शहरातील आर. आर. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार लताताई सोनवणे, प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे तसेच बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक गौरव चंद्रकांत सोनवणे हेही उपस्थित होते.

सर्वांनी एकत्रितपणे मतदान केंद्रावर हजेरी लावत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण केली. राजकीय जबाबदारीबरोबरच नागरिक म्हणून मतदान करणे हे कर्तव्य असल्याचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुरू असलेल्या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले असून, मतदारांमध्ये सकाळपासूनच मतदानाबाबत उत्साह दिसून येत आहे. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असा अप्रत्यक्ष संदेश या नेत्यांनी दिल्याचे मतदारांमध्ये चर्चिले जात होते.


Protected Content

Play sound