जळगाव प्रतिनिधी । नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे शनिवारी नैसर्गिक केळी लागवड चिंतन परिषदेसह रविवारी विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. रंजना बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासानियकखते, व कीटकनाशकांचा अनिर्बंध वापरामुळे जमिनी नापीक झाली आहे. निसर्गाचा समतोलही वाढला आहे. यामुळे वैश्विक तापमान वाढीचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमिवर, शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेस सरदार पटेल लेवा भवनात चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दुसर्या दिवशी म्हणझे रविवारी विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन यावर कार्यशाळा रविवारी आकाशवाणी चौकाजवळील लाडवंजारी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती डॉ. रंजना बोरसे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.