Home क्राईम जळगाव परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
162

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याबबात रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहेत. बुधवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोरा आल्यानंतर पिडीत मुलीचे पालक व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय किरण कोते हे करीत आहे.


Protected Content

Play sound